Ad will apear here
Next
आज अनुभवा गुरू-शनी महायुती : ४०० वर्षांनी घडत असलेली दुर्मीळ खगोलीय घटना
गुरू-शनीची दुर्मीळ युती - गुगलने केलेले डूडल

आज २१ डिसेंबर अर्थात पृथ्वीवरच्या आपण राहतो त्या उत्तर गोलार्धातला सर्वांत लहान दिवस. आजपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या वार्षिक घटनेला जोडून या वर्षी आज (२१ डिसेंबर २०२०) एक दुर्मीळ खगोलीय घटना घडणार आहे आणि आपल्याला ती सायंकाळी प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे. गुरू आणि शनी हे आपल्या सूर्यमालेतले सर्वांत मोठे आणि वायुरूप असलेले ग्रह आज एकमेकांपासून सर्वांत जवळ येणार आहेत. या घटनेला गुरू-शनी युती (Conjunction) असे म्हटले जाते. गेले काही दिवस या ग्रहांमधलं अंतर कमी होत असून, आज (२१ डिसेंबर २०२०) सायंकाळी ते सर्वांत कमी झाल्याचं (Great Conjunction) पाहायला मिळणार आहे. 

अशी घटना याआधी ४०० वर्षांपूर्वी म्हणजेच १६२३ साली घडली होती. तसेच, यानंतर ही घटना १५ मार्च २०८० रोजी घडणार आहे. त्यामुळे ही अत्यंत दुर्मीळ घटना अनुभवण्याची अभूतपूर्व संधी आपल्याला लाभली आहे. 

गुरू-शनी युतीचे २० डिसेंबर २०२० रोजीचे छायाचित्र (सौजन्य : खगोलविश्व)

गेले काही दिवस सूर्यास्तानंतर क्षितिजावर नैर्ऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेला जवळपास तासभर गुरू आणि शनीची जोडी दिसत आहे. २१ डिसेंबर २०२० रोजी या दोन ग्रहांमधील अंतर फक्त ०.१ अंश एवढे असेल. हे अंतर पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राच्या व्यासापेक्षा पाच पटींनी कमी असेल. कोणत्याही दुर्बिणीशिवाय आपण पाहिले, तर हे दोन ग्रह नसून एकच ग्रह असल्याचे दिसेल. हे दोन ग्रह इतक्या जवळ आले, तरी प्रत्यक्षात अंतराळातील त्यांचे एकमेकांपासूनचे अंतर सुमारे ४५ कोटी मैल एवढे असेल. ही घटना संपूर्ण पृथ्वीवरून कुठूनही दिसणार आहे. गुगलने नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या मदतीने आजच्या दिवसासाठी एक खास डूडलही तयार केले आहे. आज गुगलवर जाणाऱ्या प्रत्येकाला ते पाहायला मिळेल. (गुगल डूडलबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सायंकाळी सहाच्या सुमारास सूर्यास्त होणार आहे. तिथपासून सुमारे दीड तास म्हणजे रात्री साधारण साडेसात वाजेपर्यंत ही घटना पाहता येणार आहे. कारण आठ वाजण्याच्या सुमारास हे ग्रह मावळणार आहेत. साध्या डोळ्यांनी पाहताना हे दोन्ही ग्रह एकच दिसतील. छोट्या दुर्बिणीतून पाहिले, तर ग्रहांची जोडी दिसू शकेल. मोठ्या दुर्बिणीतून पाहिल्यास गुरू, शनीसह त्या दोघांचेही चंद्रही (उपग्रह) पाहता येणार आहेत. 

पुण्यातील खगोलविश्व या संस्थेच्या फेसबुक पेजवर (https://www.facebook.com/khagolvishwa/) मोठ्या दुर्बिणीच्या साह्याने ही दुर्मीळ खगोलीय घटना लाइव्ह प्रसारित करण्यात येणार आहे. प्रत्येकाने या दुर्मीळ घटनेचे जरूर साक्षीदार व्हावे.

(गुरू आणि शनीची युती कशी पाहावी, याबद्दल मार्गदर्शन करणारा नासाचा व्हिडिओ)




(खगोलविश्व संस्थेने २० डिसेंबर २०२० रोजी पुण्यातून केलेले फेसबुक लाइव्ह)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NVLWCT
Similar Posts
नासा आणि स्पेस एक्सची ऐतिहासिक मानवी अंतराळ मोहीम (व्हिडिओ) ‘नासा’च्या दोन अंतराळवीरांना घेऊन स्पेस एक्स कंपनीचे ‘द क्रू ड्रॅगन’ हे अंतराळयान ३१ मे रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले. स्पेस एक्स ही एलॉन मस्क यांची कंपनी असून, कोणत्याही खासगी कंपनीच्या यानाने अंतराळवीरांनी अंतराळात प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळेच ही मोहीम ऐतिहासिक होती. बॉब
Christina Koch, first woman who spent record 328 days in Space, returns from Space Station After setting a record for the longest single spaceflight in history by a woman, NASA astronaut Christina Koch returned to Earth Thursday, along with Soyuz Commander Alexander Skvortsov of the Russian space agency Roscosmos and Luca Parmitano of ESA (European Space Agency). The trio departed the International Space Station at 12:50 a
‘पेल ब्लू डॉट’ची तिशी! पाच सप्टेंबर १९७७ रोजी अमेरिकेने ‘व्हॉएजर १’ हे अवकाशयान आपल्या सूर्यमालेचा अभ्यास करण्यासाठी सोडले. ते फेब्रुवारी १९९०मध्ये गुरू, शनी, युरेनस आणि नेपच्यून ह्या दूरच्या ग्रहांचा अभ्यास करत आपल्या सौरमालेच्या काठावर पोहोचले... १४ फेब्रुवारी १९९० रोजी ते यान जेव्हा आपल्या सूर्यमालेच्या कक्षा ओलांडून
आंतरराष्ट्रीय विज्ञानपट महोत्सवात पुणेकर ‘कस्तुरी’च्या यशाचा दरवळ पुणे : दहावीत शिकणाऱ्या कस्तुरी कुलकर्णीने बनवलेल्या ‘सिंबायोसिस’ या लघुपटाला ‘इंटरनॅशनल सायन्स फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये तृतीय पुरस्कार मिळाला आहे. कस्तुरी ‘बेरीज वजाबाकी’ या मराठी चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शकसुद्धा आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language